राज्यात मार्च महिन्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. काही जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे उष्णता प्रचंड वाढली आहे. उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू देखील होऊ लागले आहेत. अशी परिस्थिती असताना हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. खरंतर उन्हाळ्यात कधी पाऊस होत नाही. पण हवामानात बदल झाला की उन्हाळ्यात पावसाचा अनुभव येतो. भारतीय हवामान विभागाने राज्यात (IMD Rain Alert) काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. यानुसार विविध ठिकाणी अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यांतील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. लातूरमध्ये जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी पिकांना मात्र फटका बसला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होईल असा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश ढगाळ राहील. अनेक शहरांत उन्हाच्या झळा अधिक तीव्र होतील त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहे पडताना उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.