14.9 C
New York

Uddhav Thackeray : दिशा सालियनप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Published:

सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian Case) मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना, आता शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी अखेर मौन सोडलं आहे. दिशाच्या वडिलांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता कोर्ट, राजकारण आणि तपास यामध्ये हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.

Uddhav Thackeray सतीश सालियन यांची मागणी आणि आरोप

दिशा सालियन (Disha Salian Case) यांचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांनी या प्रकरणावर प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं, “दिशा सालियन प्रकरणी माझ्याकडे काहीही माहिती नाही. या विषयाशी माझा कुठलाही संबंध नाही. जे माहिती नाही त्यावर मी बोलत नाही. मात्र आता त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी या संपूर्ण प्रकरणातून आपला दूरचा संबंधही नाकारला आहे. मात्र, यावरून पुन्हा एकदा राजकीय टीका-प्रतिटिकेची शक्यता वाढली आहे.

Uddhav Thackeray राजकीय आरोप-प्रत्यारोपांना मिळाली गती :

सतीश सालियन यांच्या याचिकेनंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेत्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप करत, सत्तेच्या काळात गुन्हे दडपल्याचा आरोप लावला आहे. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाने हे सर्व राजकीय सुडातून प्रेरित असल्याचा दावा केला आहे.

सतीश सालियन यांची याचिका सध्या उच्च न्यायालयात आहे. CBI चौकशी होणार का? आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार का? हे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल. दरम्यान, ठाकरे गट या प्रकरणात सावध धोरण घेत असल्याचं दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img