15.1 C
New York

Uddhav Thackeray : अधिवेशन काळात सत्ताधाऱ्यांचा माज दिसला, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

Published:

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. या अधिवेशनानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी घणाघात केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. हताशा, निराशावादी अर्थसंकल्प होता. ही अस्वस्थता, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. विशेषत: जेव्हा हे सरकार स्थापन झालं, तेव्हा 100 दिवसात आम्ही काय करणार हा संकल्प त्यांनी केला होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरु आहेत. हमीभाव मिळत नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray सत्ताधाऱ्यांचा माज दिसला

अधिवेशन काळात देशाला राज्याला चांगलं गाणं मिळालं. हे समाधान मानावे लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असं अधिवेशन आहे. हे जयंत पाटील म्हणाले ते बरोबर आहे. सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. या पूर्वी कधीही गेल्या काही वर्षात विरोधी पक्षाने राज्यपलांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात आणि त्याचा वापर कसा करतात हे सांगितलं. असं कधी घडलं नव्हतं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्या अनेक वर्षात सभापतीवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागला. असं कधीच झालं नव्हतं. अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि उत्तरं दिली असती तर मला जनतेसमोर बोलण्याची वेळ आली नसती. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा घोषणा केल्या. वारेमाप घोषणा केल्या. जनतेला फसवा, जनता भोळीभाबडी आहे. मग सत्तेत यायचं आणि जनतेना चिरडून टाकलं. ही दडपशाही आहे. ही दडपशाही ब्रिटीशांना जमली नाही ती यांना काय जमणार, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray हे बोगस हिंदुत्ववादी आहे

मुस्लिमांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले होते. मुस्लिमांनी मते दिले तर सत्ता जिहाद म्हणायचे. आता ईद निमित्त सौगात हे मोदी हा कार्यक्रम भाजपने घेतला आहे. ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन ३२ लाख भाजपचे कार्यकर्ते भेट देणार आहे. हा सौगात ए मोदी नाही. हा निर्लज्जपणा आहे. सौगात ए सत्ता आहे. हे बोगस हिंदुत्ववादी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray भाजपने एकदा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं

मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढला. हिंदूच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार? हिंदुत्ववादी पक्ष आता आहे का? सौगात ए सत्ता ही बिहार यूपी निवडणुकीपर्यंतच राहणार की अजूनही राहणार आहे. भाजपने एकदा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img