13.8 C
New York

Salman Khan : लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांवर अखेर सलमान खानने केले भाष्य

Published:

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. लॉरेन्स बिश्नोईसह त्याच्या टोळीने सलमान खानला अनेकदा ठार मारण्याची धमकी दिली आहे. ऑक्टोबर 2024 मध्येही सलमान खानचे जवळील मित्र असलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली होती. त्यापूर्वी सलमान खानच्या घरावरही गोळीबार करण्यात आला होता. यावर सलमान खानने कधीही भाष्य केले नव्हते. अखेर सलमान खानने लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या धमक्यांवर मौन तोडले आहे.

सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सलमान खानने वैयक्तिक आयुष्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबद्दल विचारण्यात आले. तेव्हा, सलमान खानने अधिक बोलणे टाळले. “अल्लाह है, भगवान है, सब उन पर है… नियतीने माझ्या नशिबात जेवढे आयुष्य लिहिले आहे, तेवढे आहे. बस इवढेच… कधी कधी इतक्या साऱ्या लोकांना सोबत घेऊन चालताना अडचणी निर्माण होतात,” असे सलमान खानने म्हटले आहे.

Salman Khan सलमान खान अन् बिश्नोई वाद काय?

1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होते. मात्र, ही गोष्ट सलमान आणि त्याचे वडली सलीन खान यांनी नाकारली आहे. याच प्रकरणात सलमाना 2006 मध्ये सीजेएम न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. तर, जोधपूर न्यायालयाने त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावलेली. 7 एप्रिल 2018 ला सलमानला 50 हजार रूपयांवर बॉन्डवर जामीन देण्यात आला. तर, राजस्थान उच्च न्यायालयाने 2016 मध्ये सलमान खानला आरोपमुक्त केले होते.

तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या पाठीमागे हात धुवून लागला आहे. बिश्नोई समाजात प्राणी, विशेषत: काळवीटांना देवा समान मानले जाते. सलमानमुळे संपूर्ण बिश्नोई समाजाच्या मनावर जखमी झाली आहे. लॉरेन्स बिश्नोईने 2018 मध्ये जोधपूर कोर्टात हजेरी लावलेली. तेव्हा सांगितले की, ‘आम्ही सलमान खानला ठार मारू. एकदा आम्ही तसं केल्यावर प्रत्येकाला कळेल. मी अद्याप काहीही केले नाही, तरी ते माझ्यावर कोणत्याही कारणास्तव गुन्ह्याचा आरोप करीत आहेत.’

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img