14.9 C
New York

Manoj Jarange  : ‘धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नका, त्यांच्यावर’, जरांगे पाटील सरकारवर कडाडले

Published:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु्ख यांची (Santosh Deshmukh Case) अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट मिळाली आहे. वाल्मिक कराडच्या टोळीतील तिघा जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणी मनोज जरांगे (Manoj Jarange)  पाटील यांनीही भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांना पाठीशी घालू नका असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

जरांगे पाटील म्हणाले, या प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे म्हणजे आहेच. त्याला पाठीशी न घालता त्याच्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. एका चिल्लर कामासाठी एका चांगल्या लेकराचा खून केला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. एक नंबरच्या आरोपीने हे करायला लावलं. हे इतरांनी कबूल केलं. आता ह्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहीजे. हे सगळे लोक धनंजय मुंडेंचेच आहेत. यात त्यांचाही सहभाग आहे. हा खूप महत्वाचा विषय आहे. मात्र सरकारने धनंजय मुंडेला फुलस्टॉप द्यायचं काम केलं ते करायला नको होतं.

यानंतर जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचं काम अजित पवार (Ajit Pawar) यांनीही डोक्यावर घ्यायला नको. धनंजय मुंडे या कटात सहभागी असल्याने त्याच्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली.

Manoj Jarange  ..म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली

सुदर्शन घुलेने पोलिसांना सांगितले की मयत संतोष देशमुख यांनी सुद्धा आम्हाला मारहाण केली होती. आमचा अपमान केला होता. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हाच संतोष देशमुख यांनी आम्हाला मारहाण केली. मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आम्हाला आव्हान दिले होते. संतोष देशमुख यांच्या या कृतीचा आम्हाला राग आला होता म्हणून आम्ही त्यांना मारण्याचा प्लॅन आखला होता, असे घुले याने सांगितले.

आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यातही संतोष देशमुख यांचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर तिरंगा हॉटेलमध्येही एक बैठक झाली होती असे सुदर्शन घुले याने सांगितले. संतोष देशमुख यांची हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली आरोपी महेश केदारने पोलिसांना दिली. जयराम चाटे या आणखी एका आरोपीने त्याच्या विरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img