हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा भारतीय क्रिकेट संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे.नताशा स्टँकोव्हिक (Natasha Stankovic) ही सर्बियाची मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर आहे. हार्दिक पांड्याने १ जानेवारी २०२० रोजी नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी लग्न केले आणि ३० जुलै २०२० रोजी त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव ‘अगस्त्य पांड्या’ आहे. त्यांचे वैवाहिक जीवन चर्चेत राहिले आहे, आणि २०२४ मध्ये विभक्त झाले. वर्षांच्या घटस्पोटानंतर हार्दिक आणि नताशाच्या नव्या प्रेमाच्या शोधात आहेत. हार्दिक पंड्या हा ब्रिटीश गायिका जास्मिन वालियाला डेट करण्याच्या चर्चा सुरु आहेत.
एक मुलाखती दरम्यान नताशाने सांगितले, मागील वर्ष खूप आव्हानात्मक होती, पण मी पुन्हा नव्याने सुरुवात करायला तयार आहे. मी पुन्हा प्रेमात पडायला तयार आहे. आयुष्यात जे काही येईल ते स्वीकारलं पाहिजे असे माझे मत आहे. योग्यवेळी योग्य गोष्टी घडतात. पुढील काहीवर्षे पाहताच नवीन अनुभव अनुभवण्यासाठी, संधीसाठी, कदाचित प्रेमासाठी देखील तयार आहे. आयुष्यात जे काही येईल ते अनुभवण्यासाठी तयार आहे. असे नताशाने सांगितले.
नताशा स्टँकोव्हिक ही सर्बियाची मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत विविध आयटम सॉन्ग्स आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ती २०१४ मध्ये ‘बिग बॉस’च्या ८ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. हार्दिक पांड्या हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. त्याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातच्या सूरत येथे झाला. हार्दिक आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि मॅच-विनिंग कामगिरीसाठी ओळखला जातो. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि नंतर गुजरात टायटन्स संघाचा भाग होता तर आता तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसत आहे.