24.7 C
New York

EPFO : भारीच … आता UPI आणि ATM द्वारे काढता येणार PF चे पैसे, ‘या’ दिवशी मिळणार सुविधा

Published:

लवकरच देशातील कोट्यवधी लोकांना कामगार आणि रोजगार मंत्रालय आनंदाची बातमी देणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ निधी (PF Withdrawals) आता UPI आणि ATM द्वारे काढण्याची सुविधा कामगार आणि रोजगार मंत्रालय (Ministry of Labor and Employment) उपलब्ध करून देणार आहे. ज्याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे.

याबाबत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी एएनआयला सांगितले की, ही नवीन सुविधा मे किंवा जूनच्या अखेरीस सुरु करण्यात येणार आहे.

EPFO  EPFO देणार सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ आता UPI द्वारे निधी काढण्याची सुविधा ग्राहकांना देणार आहे. यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शिफारशींना मान्यता देखील दिली आहे.

EPFO  पीएफ काढण्यासाठी नवीन प्रक्रिया

एएनआयशी बोलताना डावरा म्हणाल्या की, नवीन प्रणालीअंतर्गत, ईपीएफओ सदस्य तात्काळ 1 लाखपर्यंत पैसे काढू शकतील आणि ही रक्कम त्यांच्या पसंतीच्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकतील. याशिवाय, पीएफ बॅलन्स देखील सदस्यांना UPI वर त्यांचे तपासता येईल. या बदलामुळे केवळ आर्थिक सुविधा वाढणार नाहीत तर शिक्षण, लग्न आणि वैद्यकीय उपचारांसाठी निधी लवकर काढणे देखील शक्य होणार आहे.

EPFO  पेन्शनधारकांनाही दिलासा

डावरा म्हणाल्या की, अलिकडच्या सुधारणांमुळे पेन्शनधारकांनाही फायदा झाला आहे. डिसेंबर 2024 पासून 78 लाख पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढण्याची सुविधा मिळत आहे. पूर्वी ते फक्त निवडक बँक शाखांपुरते मर्यादित होते, परंतु आता भौगोलिक निर्बंध रद्द करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img