आगामी काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदर (RBI) कपात करण्याची शक्यता आहे, कारण महागाई मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्याच्या मर्यादेत राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
RBI मंदीचे सावट
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीला धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत संथगती दिसून येत आहे. अहवालानुसार, यामध्ये पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स, ग्राहक खर्च आणि गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित ताज्या आकडेवारीत मंदीचे संकेत मिळत आहेत.
अमेरिकेतील नव्या प्रशासनाच्या धोरणातील अनिश्चितता आणि वाढत्या व्यापार तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीला फटका बसू शकतो. त्यामुळे पुढील काही काळात जागतिक विकासदर मंदावण्याचा धोका वाढला आहे.या पार्श्वभूमीवर, आरबीआय आर्थिक वाढीला गती देण्यासाठी व्याजदर कपात सुरू ठेवण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, महागाई स्थिर राहण्याची शक्यता आहे.
RBI व्याजदर कमी करण्याची शक्यता
अहवालात बँकिंग क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. 2023-24 आणि 2024-25 च्या पहिल्या सहामाहीत बँकांचे कर्जवाढीचे प्रमाण ठेवींच्या वाढीच्या तुलनेत जास्त होते. मात्र, आता हे प्रमाण जवळपास एकसारखे झाले आहे. आगामी काळात आरबीआयच्या वित्तीय धोरणांकडे बाजाराचे लक्ष असेल, कारण मध्यवर्ती बँकेला आर्थिक वाढीला चालना देतानाच महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान कायम आहे.