21.2 C
New York

Yujvendra Chahal-Dhanshree Verma : चहल आणि धनश्री घटस्फोट प्रकरण, विभक्त होण्याचे खरे कारण आले समोर

Published:

क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yujvendra Chahal) आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanshree Verma) यांचा २० मार्च रोजी (Yujvendra Chahal-Dhanshree Verma) घटस्फोट झाला. लग्नाच्या चार वर्षांनी हे दोघे विभक्त झाले. चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाची बातमी ऐकताच चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला.सध्या घटस्फोटाचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार वरिष्ठ पत्रकार विकी लालवाणी यांनी सोशल मिडिड्यावर चहल आणि धनश्री यांच्या विभिक्त होण्याचे कारण सांगितले आहे. चहल आणि धनश्री या दोघांच्या पर्सनॅलिटी खूप वेगेवेगळ्या आहेत. त्यामुळे ते फार काळ एकत्र राहू शकत नाही. धनश्रीने चहलकडे हरियाणातून मुंबईला रहाण्याचा हट्ट करत होती. चहलने धनश्रीसोबत मुंबईला यावे असे तिला वाटत होते. पण चहल काही आई वडिलांना सोडून येण्यास तयार नव्हता.

लग्नानंतर चहल आणि धनश्री काहीवर्षे हरियाणात राहत होते. काम असल्यास ते मुंबईला येत होते. यावरूनच त्यांच्यात वाद सुरु झाले. आईवडिलांना सोडून मुंबईला येणार नाही असे स्पष्ट धनश्रीला सांगितले. घटस्फोटच्या कारणामधील एक हे कारण असू शकते. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा २२ डिसेंबर २०२० रोजी लग्नबंधनात अडकले होते. गेल्या दोन वर्षांपासून दोघे वेगळे राहत आहेत. चहलने धनश्रीला ४. ७५ देण्याचे मजूर केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img