6.8 C
New York

Phule Movie : सामाजिक क्रांतीचा प्रवास उलगडणारा ‘फुले’ चित्रपट येतोय ११ एप्रिलला

Published:

आज हिंदी चित्रपटाचा बहुप्रशिक्षीत ट्रेलर लाँच झाला. या चित्रपटाचे नाव ”फुले” असे (Phule Movie) असणार आहे. हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची आणि समाजसुधारणेच्या कहाणी सांगणार आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्री-शिक्षणाच्या प्रवर्तक होत्या. झी स्टुडिओ प्रस्तुत डान्सिंग शिव फिल्म यांच्या अंतर्गत प्रदर्शित होणार आहे. ११ एप्रिल २०१५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील स्त्री शिक्षण, जातिव्यवस्था निर्मूलन आणि सामाजिक सुधारणा यासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळेच शिक्षणाचा मार्ग सर्वांसाठी खुला झाला आणि समाजात परिवर्तन घडवले. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते अंनत नारायण महादेवन यांनी सांभाळली आहे. याआधी अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. महात्मा फुले यांची भूमिका प्रतीक गांधी यांनी साकारली आहे तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहेत. विनय पाठक यांनी देखील महत्वाच्या भूमिकेत काम केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img