क्रिकेटर के.एल राहुल (K.L Rahul ) आणि अथिया शेट्टी (Aathiya Shetty) हे दोघे आई वडील झाले आहेत. KL Rahul- Aathiya Shetty के.एल राहुल आणि अथिया शेट्टी यांना कन्यारत्न प्राप्त झाली आहे. दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही गोड बातमी चाहत्यांपर्यंत पोहचवली. त्यानंतर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी अभिनंदन करत सुंदर असे कॉमेंट करायला सुरुवात केली आहे. सध्या सुनील शेट्टी हे आजोबा झाल्यामुळे त्यांच्या घरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
अभिनेत्री आथिया शेट्टीने काल (२४ मार्च ) संध्याकाळी ‘आम्ही एका मुलीचे पालक झाली’… अशी पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या पोस्टवर कियारा अडवाणीने हार्टचे ईमोजी वापरून कॉमेंट केली आहे. अर्जुन कपूरने देखील अभिनंद मित्रांनो अशी कॉमेंट केली आहे. याचबरोबर पंजाबी गायक जसी गिलने शुभेच्छा दिल्या आहेत. आथियाच्या या पोस्टला एका मिनिटात दोन लाखाहून जास्त लाइक्स आले आहेत.
के.एल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी अनेक वर्षाच्या डेटिंग नंतर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नात अनेक सेलिब्रिटी आणि जगातील अनेक क्रिकेटर उपस्तिथ होते. लग्नाच्या दोन वर्षांनी एका गोंडस मुलीचे आई बाबा झाले आहेत. आथिया हि सुनील शेट्टी यांची कन्या आहे. हिने ‘हिरो’ चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मोतीचूर चकणाचुर आणि मुबारका यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे पण बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकले नाही. त्यानंतर आथिया चित्रपटसृष्टीपासून दूर निघून गेली. के.एल राहुल हा एक भारतीय क्रिकेटर आहे. राहुलने icc चॅम्पिअनस ट्रॉफीमध्ये उत्तम कामिगिरी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅप्टिलच्या संघात खेळणार आहे.