16.9 C
New York

Kunal Kamra : कामराला पोलिसांचे समन्स, सकाळी 11 वाजता चौकशीसाठी केले पाचारण

Published:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त कविता म्हणणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले आहे. पोलिसांनी कुणाल कामराला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र कुणाल मुंबईत नसल्याने कुणालच्या वडिलांकडे हे समन्स सोपवण्यात आले. याशिवाय, पोलिसांनी कुणाल कामराला WhatsAppद्वारे समन्स पाठवले असून चौकशीसाठी त्याला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. (Mumbai Police summons Kunal Kamra)

खार पोलिसांनी कुणाल कामराच्या घरी समन्स पाठवून आज, मंगळवारी सकाळी 11 वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. कुणाल सध्या मुंबईत नाही. स्टँड-अप कॉमेडी शो दरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामराच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. आता तो पुढील तपासासाठी खार पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे, असे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नागपूर हादरलं ! एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता केलेल्या या कवितेमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रविवारी (23 मार्च) रात्री खार परिसरातील हॉटेल युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केली. कुणाल कामराचा शो याच हॉटेलमध्ये चित्रित झाला होता. कुणाल कामराने आपल्या शोमध्ये ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील ‘भोली सी सूरत, आँखों में मस्ती….’ या गीतावर एक विडंबनात्मक गाणे सादर केले होते. त्यात 2022मधील एकनाथ शिंदे यांच्या बंडांचा संदर्भ देण्यात आला होता. या गाण्यात एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता गद्दार म्हटल्याने शिवसैनिक कामरा याच्यावर संतापले.

तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केली आहे. पण, सोमवारी रात्री उशिरा कामराने आपली भूमिका जाहीर केली. मी माफी मागणार नाही, असे कुणाल कामराने स्पष्ट केले आहे. कुणाल कामराने सोशल मीडियावर आपले स्टेटमेंट शेअर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कुणाल कामराला खार पोलिसांनी समन्स बजावले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img