10.4 C
New York

Sanjay Raut : कामरा अन् माझा DNA सारखाच; राऊत बोलले अन् विरोधकांच्या जाळ्यात अडकले…

Published:

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गाणं म्हटल्याने राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. शिंदे गटाकडून कुणाल कामरावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून कुणाल कामराचा समर्थन करण्यात येत आहे.

कुणाल कामरा याचा समर्थन करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझं आणि कामरा याचा डीएनए एकचं आहे असं म्हटले आहे. तर आता संजय राऊतांना भाजप आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांनी प्रत्युत्तर देत हरामखोरांचा डीएनए (DNA) एकच असतो अशी टीका केली आहे. तसेच तेलंगणामध्ये काॅंग्रेसच्या (Congress) एका नेत्याकडे कोरटकर लपुन होता असा धक्कादायक दावा देखील त्यांनी केला आहे.

तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी देखील खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर देत जहरी टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना कामरा आणि राऊत एकाच बापाची औलाद असतील असं संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी माध्यमांशी बोलताना कुणाल कामरावर देखील हल्लबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, त्याला (कुणाल कामरा) जास्त माज चढलेला आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे. असं संजय गायकवाड म्हणाले. तर उद्धव ठाकरे कोणत्या तोंडाणे म्हणता गद्दार आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली त्यामुळे आम्ही उठाव केला, आम्ही पुन्हा निवडून आलेलो आहोत असेही यावेळी संजय गायकवाड म्हणाले.

Sanjay Rautनेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

कुणाला कामरा जेव्हा नवीन आला तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांसोबत देखील असे शो केले आहेत. मी त्यांच्या स्टुडिओत गेलो आहे. माझ्यावर देखील असे अनेक जण टिपण्णी करतात. तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकला असता मग स्टुडिओ का तोडली यालाच औरंगजेबची वृत्ती म्हणलं जात.

तोड्याचं असेल तर मंत्र्यांचे बंगले *तोडा,मलबार हिल परिसरात असलेले मंत्र्यांचे अनेक बंगले अनधिकृत आहेत. रिक्षावाल्या ला रिक्षावाला म्हणलं तर काय चुकीचे आहे? माझं आणि कामरा चा डीएनए एकचं आहे. असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img