7.6 C
New York

Onion Market Price : निर्यातशुल्क हटवण्यास केंद्राकडून विलंब; कांद्याच्या बाजार भावावर मोठा परिणाम

Published:

केंद्रसरकारने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटवण्यास जास्त विलंब केला. त्याचा परिणाम होऊन कांद्याच्या बाजारावर काडीमात्र फरक पडला नाही. निर्णयाआधी पुणे व लोणंद बाजार (Onion Market Price) समित्यांमध्ये कांद्याचे दर ८०० ते १७०० रूपये प्रतिक्विटंल होते ते आजही जैसे’थे’च आहेत. कांद्याची आवक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कांद्याला उठाव मात्र मिळणार आहे.

दिवाळीनंतर खरीप कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येऊ लागल्यावर कांद्याच्या भावात घसरण झाली. त्यावेळीच निर्यातशुल्क शून्यावर आणणे आवश्यक होते. केंद्रसरकारने मे २०२४ मध्ये निर्यातबंदी शिथिल करत चाळीस टक्के निर्यातशुल्क लावले. सप्टेंबर २४ मध्ये निर्यातशुल्क वीस टक्क्यांवर आणले. खरीप कांदा संपून रब्बी कांदा बाजारात येऊ लागल्यावरही निर्यातशुल्क जैसे थे ठेवले गेले. मात्र, कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरवातीला प्रतिक्विंटल ३००० रूपये असलेला कांदा फेब्रुवारीच्याखेरीस प्रतिक्विंटल २६०० रूपये झाला.

तब्बल दीड हजार रूपयांनी मार्चमध्ये दर कोसळले होते. मात्र तरीही केंद्रसरकारला पाझर फुटला नाही. अखेर २२ मार्चला निर्यातशुल्क शून्यावर आणले. मात्र आता महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या सर्व कांदा उत्पादक राज्यात उत्पादन चांगले झाले आहे. दुसरीकडे पाकीस्तानचा कांदा स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्याने भारतीय कांद्याला परदेशातून कितपत मागणी राहते याबद्दल चिंता आहे. या वातावरणामुळे २० मार्चला पुणे बाजार समितीत कांद्याला ७०० ते १७०० रूपये आणि लोणंद बाजार समितीत ८०० ते १७०० रूपये प्रतिक्विंटल असे मिळालेले दर आज काडीमात्र वाढले नाहीत.

निर्यातीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीस १ एप्रिल उजाडेल. शिवाय सध्या नाशिक, नगर, पुणे मधून कांद्याच्या आवकेचा जोर जास्त आहे. राजस्थान चालू होईल. मध्यप्रदेशातून पुढील महिन्यात अधिकाधिक आवक येईल अशी चिन्हे आहेत. कांदा निर्यातदार बिपिन शहा म्हणाले, ईदनिमित्तची मागणीही कमी झाली आहे. सरकारला आयात-निर्यातीच्या धोरणाचा खेळखंडोबा करायचा असेल तर करावा. मात्र, पंचवीस रूपये किलोपेक्षा दर घटले की दुधाप्रमाणे प्रतिकिलो पाच रूपये अनुदान द्यावे. पंधरा ते सतरा रूपये दराने भांडवलही निघत नाही.

Onion Market Price लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळालेले दर

दिनांक दर प्रतिक्विंटल

२७ फेब्रुवारी १२०० ते २६००

६ मार्च ८०० ते २४००

१३ मार्च ८०० ते १६७०

२० मार्च ८०० ते १७००

२४ मार्च ८०० ते १७५०

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img