2.3 C
New York

Uddhav Thackeray : गाण्यात कोणताही दोष नाही, जे गद्दार ते गद्दारच; ठाकरेंचा कुणाल कामरला फुल्ल पाठिंबा

Published:

स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक व्यंगात्मक व्हिडिओ बनवला आहे. यावरून शिंदे सैनिकांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलाय. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) पाठिंबा दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणाल कामराने सत्यात्मक गाणं केलंय. आम्ही आज पण बोलतोय. चोरी करणारे गद्दार आहे. शिवसैनिकांनी तोडफोड केली नाही. गद्दार सेनेच्या एसएनसीच्या लोकांनी केले असेल. भेकड लोकांनी आपल्या नेत्याचा अपमान झाला (Kunal Kamra Video) म्हणून तोडफोड केली. कामरांनी जनभावना व्यक्त केल्या आहेत. सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर कारवाई नाही. कामराच्या जागेचं नुकसान केलं, ते भरुन दिलं पाहिजे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य गद्दारींसाठी कसं काय? असा देखील सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. पोलीसांचा दरारा कमी करण्यासाठी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचे काही चालत नाही. अजित पवार यांचे धन्यवाद. आजूबाजूच्या लोकांना त्यांनी आवरलं पाहिजे. नागपूरची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबच्या थडग्याची सुपारी कोणी दिली होती? अनाजी पंतांचा वारसा चालवायचा की संभाजी महाराजांचा, गृहमंत्री तुम्ही आहात ना? तरीही नागपुरात दंगा कसा होतो असं देखील उद्धव ठाकरे यांनी विचारलं आहे.

कामराचे गाणे ऐकवा. सत्यमेव जयते खोडून टाका आणि गद्दामेव जयते करा.खरोखर इतिहास तज्ज्ञ असतील, तर त्यांच्याकडून यासंदर्भात संशोधन समोर आलं पाहिजे. त्यानंतरच यासंदर्भात काय ते वाघ्या कुत्र्यांसंदर्भात स्पष्ट होईल, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र, सध्या राज्यात इमान उखडून टाकलाय असं दिसत असल्याचा टोला देखील ठाकरेंनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img