बॉलीवूड अभिनेत्यांपासून ते क्रिकेटर नेहमीतेंच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत संपर्कात असतात. सध्या क्रिकेटरर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. घटस्फोटबरोबर चहलने दिलेल्या पोटगीची चर्चा सुरू आहे. एकेकाळी अशीच चर्चा अभिनेत्याच्या बाबतीत सुरु होती. या अभिनेत्याने त्याच्या पत्नीला ३८० कोटीची पोटगी दिली होती. एवढ्या कोटींची पोटगी दिल्यांनतर या अभिनेत्याच्या नेटवर्थ किती असेल असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असणार. या अभिनेत्याची नेटवर्थ ३१०१ कोटी इतकी आहे.
या अभिनेत्याचा वय ५१ आहे तर त्याची प्रियासी त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ह्रतिक रोशन आहे. ह्रतिक रोशनची (Hrithik Roshan) वर्षाची कमाई २६० कोटी आहे. मुंबईतीळ जुहू- वर्सोव लिंकच्या येथे ह्रतिकने नवीन एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीवर ९७.५० कोटी खर्च केले आहे. ३,८०० चा स्केअर फिटच घर असून टेरेस हा ६,५०० स्केअर फिटचा आहे. ह्रतिकने १४,१५,१६ माळा खरेदी केला आहे. २२ कोटीपेक्षा ह्रतिक एका चित्रपटाचे मानधन घेतो. दिल्लीमध्ये त्याचे रेस्टोरंट आहेत. त्याचबरोबर मुंबई, हैदराबाद, बंगळुरू शहरामध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ह्रतिककडे अनेक गाड्या देखील आहेत.
ह्रतिक रोशन ने सुजाण खानसोबत २००२मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्या दोघांना २ लहान मुलं आहेत एकाचे नाव रेहान आणि दुसऱ्याचे नाव हृदांन आहे. १४ वर्ष सुखाचा संसार करून त्या दोघांनी २०१३मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.