8.9 C
New York

Sanjay Raut : राज ठाकरे यांच्या या विधानावर, संजय राऊत यांचं रोखठोक मत

Published:

“मी रोज टीकात्मक लिहितो. माझं काम आहे ते. मग रोज गुन्हे दाखल होतील. विधासनभेतील कामकाज सदस्यांचं पाहिलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदेंचं सभागृहातील भाषण वाचा, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. कमजोर लोकांवर कशाला. कुणाल कामरावर गुन्हा का?” असा सवाल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे. स्टँअप कॉमेडीनय कुणाल कामराने शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांबद्दल गाण्यातून आक्षेपार्ह टीका केली. त्यांना गद्दार म्हटलं. त्यामुळे खवळलेल्या शिवसैनिकांनी कामराचा स्टुडिओ फोडला. त्याला चोपण्याची धमकी दिली.

यावर संजय राऊत कुणाल कामराच्या बाजूने बोलले आहेत. “अख्खं सभागृह खोक्याने भरलं की नाही त्याच्याशी असहमत आहे. विधीमंडळात खोकेभाई भरले असं राज ठाकरे म्हणाले. त्यांचं विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवलं आहे. असे खोके भाई राजकारणात असल्याने ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही. भूमिका नाही. नैतिकता नाही. ते सर्व खोके भाई एकत्र झाले आणि त्यांनी सरकार बनवलं” असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut ‘दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते’

फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली. त्यावर संजय राऊत बोलले आहेत. “दंगल दोन्ही बाजूने घडली आहे. ठिणगी दोन्ही बाजूने पडली आहे. हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करत आहे. दंगलखोरांवर बुलडोझर फिरला पाहिजे. पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तुमच्या विचाराचे समर्थक आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा कुणी काढला? ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याने दिली आहे. जा कोकणात बुलडोझर पाठवा. किंवा पुण्यात बुलडोझर पाठवा. तुमच्या लोकांनी वक्तव्य केली. त्यामुळे लोकांना चालना मिळाली. तुम्ही समान नागरी कायदा म्हणताना मग सर्व पक्षाच्या धर्माच्या दंगलखोरांवर एक सारखी कारवाई झाली पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img