10.6 C
New York

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवच्या एका वाक्याने बदलले तृप्तीचे आयुष्य, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा घेतला मोठा निर्णय!

Published:

मराठी कलाकार नेहमीच खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. कधी फिरायला जातानाचे फॅमिली सोबत फोटो पोस्ट करत असतात. मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा देखील त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. मराठी बरोबर त्याने हिंदी चित्रपटांमध्ये देखील कॉमेडी रोल्स केले आहेत. सिद्धार्थ जाधवने २००७ मध्ये तृप्ती अक्कलवारशी प्रेमविवाह केला. त्यानंतर काही वर्षी तृप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सिद्धार्थचे आडनाव काढले. एका मुलाखती दरम्यान स्वतःच्या नावामागचे सिद्धार्थचे आडनाव का काढले हे सांगितले.

यावेळी ती म्हणाली सिद्धार्थला चित्रपटांमध्ये खूप छान रोल्स मिळतात. तो पूर्णपणे त्याच्या आयुष्यात सेट झाला आहे, मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये मी आई झाली त्यानंतर मी नोकरी सोडली. कारण प्रत्येक बाईला चुल आणि मुलं हे काही सुटलेला नाही त्यामुळे मी ब्रेक घेतला आणि सिद्धार्थला मॅनेज करायला सुरुवात केली. सिद्धार्थचे नाटकांच्या तारखा, शूटिंगच शेड्युल सारखा मी पाहत होते. मुलखात देत असताना तृप्तीने तिच्या सोबत घडलेला प्रसंग बदल सांगितले. २०२० कोविडचा काळ सुरू होता. तेव्हा आमची भांडण झाली नवरा बायको म्हटलं तर भांडण होणारच तेव्हा सिद्धू मला म्हणाला तुला कोण ओळखत माझ्यामुळे सर्वजण तुला ओळखतात. तुझी काय ओळख आहे? हे माझ्या मनाला लागलं तेव्हा मला कळलं माझं आयुष्य काय माझं स्वप्न काय… त्यानंतर मी पुन्हा जॉब करण्याचा निणर्य घेतला पण दोन मुलींना सांबाळून जॉब करण कठीणच होत.

१९- २० वर्षाची असताना बिजनेस करणं हे स्वप्न होत. त्याच क्षणी ती इच्छा जागृत झाली आणि मी ठरवलं बिजनेस करायचं बिजनेस करण्यासाठी पैसे हवे होते पण मी नवऱ्याकडून पैसे न घेण्याचा निर्णय घेतला. ५० लाख गुंतवायचे होते. तेव्हा मी सिद्धूला सांगितलं नाही. त्यावेळीस मी मित्रांकडून कुटुंबियांकडून ७ ते ८ टक्याने पैसे घेतले. स्वैरा इंटरप्रायजेसच्या नावाने माझा ब्रँड आहे. बनारसी साड्या, ओढण्या, साड्या विकण्यास सुरुवात केली. आमचं ९० टक्के लोन फिटलं आहे. गेल्या चार वर्षांपासून कामवाल्या पैशांपासून खूप काही केले. अशाप्रकारे मी माझी नवीन ओळख निर्माण केली आणि त्याला सांगितले तू तुझं मॅनेज कर म्हणून.. त्यानंतर ठरवलं जे नाव आहे ते नाव लावायचं कारण ती आपली ओळख आहे. सिद्धार्थ जाधवची मी बायको आहे हे मी खोडू शकत नाही पण सिद्दार्थच्या त्या शब्दानंतर मला कळले कि मला माझ्या ओळखीची गरज आहे. असे तृप्तीने मुलाखती दरम्यान सांगितले..

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img