कोण गद्दार हे सिद्ध झालंय अशी प्रतिक्रिया कुणाल कामरा ( Kunal Kamra) प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण खुद्दर आणि कोण गद्दार आहे हे जनतेने दाखवला आहे. अश्याप्रकारे अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने सांगितलं आहे स्वातंत्र्याचा स्वराचार करता येणार नाही. कामरा याने माफी मागितली पाहिजे. माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याचा काम केलं हे चुकीचा आहे. स्टँडअप कॉमेडी अशी कॉमेडी करू शकत नाही. व्यंग करण्याचा अधिकार आहे. जाणून अपमानित केले जात असेल. बदनामी करत असेल तर त्याला सहन केला जाणार. त्यावर कारवाई केली जाईल असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं. “हे चुकीच आहे. तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करण्यात काम कोणी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis ‘स्वैराचार करता येणार नाही’
“कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. ते संविधानाच पुस्तक दाखवतात. त्या संविधानाची त्यांना माहिती असेल, त्यांनी वाचलं असेल, तर संविधानाने सांगितलय स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.