स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Yogesh Kadam) याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक गाणं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले आहे. यातच आता या प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी कुणाल कामरावर कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलण्यापुर्वी कुणाल कामरा याने भान ठेवले पाहिजे होते. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. याचा त्या व्यक्तीने भान ठेवायला पाहिजे होता. कुणाल कामरा विरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. घटना कधी घडली आहे याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच कुणाल कामराचे लोकेशन शोधण्याचा काम सुरु आहे. तो आता कुठे आहे. याबाबत माहिती घेण्यात येत आहे. असं माध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
पुढे बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान आहे परंतु शिवसैनिकांची भावना समजून घेतली पाहिजे. जर असे अपमानास्पद व्हिडिओ व्हायरल केले जात असतील तर शिवसैनिंकाची प्रतिक्रिया येणे साहाजिक आहे. पण जी सेटची तोडफोड झाली आहे याचा समर्थन करता येणार नाही पण नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजे. असं देखील कुणाल कामरा प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
तर दुसरीकडे कुणाल कामरा याच्या खार येथील सेटवर शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 40 शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
Yogesh Kadam नेमकं प्रकरण काय?
एका कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राच्या सध्या राजकारणावर एक कविता सादर केली. या कवितेच्या माध्यमांतून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याने आपल्या कवितेत म्हटले की, ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….