11.1 C
New York

Chhagan Bhujbal : महात्मा की भारतरत्न कोणता शब्द प्रिय? भुजबळांनी स्पष्टच सांगितले

Published:

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी जळगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्याच आले होते. शनिवारी (ता. 22 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी छगन भुजबळांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत अनेक महत्त्वांच्या विषयांवर भाष्य केले. तर यावेळी त्यांनी त्यांना महात्मा आणि भारतरत्न या दोन शब्दांपैकी कोणता शब्द प्रिय आहे, याची सुद्धा सभेच्या माध्यमातून माहिती दिली. पण त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Chhagan Bhujbal gave information about word he loves most between Mahatma and Bharat Ratna)

जळगाव येथील ओबीसी महामेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, म्हणून काही मंडळी मागणी करीत आहेत. त्याला आपला विरोध नाही, मग महात्मा गांधी यांना भारतरत्न का नाही, महात्मा मोठा, की भारतरत्न? असा प्रश्न स्वतःच उपस्थित करत ते पुढे म्हणाले की, देशात महात्मा किती आहेत? भारतरत्न किती आहेत? आम्हाला महात्मा आणि क्रांतीज्योती हेच शब्द प्रिय आहेत. त्यामुळे महात्मा की भारतरत्न या दोन्ही शब्दांपैकी भुजबळांना महात्मा हाच शब्द प्रिय असल्याचे आता भुजबळांकडून आता स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तर, महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, तो टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी भुजबळांकडून करण्यात आले आहे.

माणिकराव कोकाटेंचा पाय खोलात! नाशिक बँकेने नोटीसच धाडली; नेमकं काय घडलं

तर, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण कमी होत आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई संपलेली नाही. आम्ही शेवटपर्यंत लढू आणि ओबीसी घटकाचे आरक्षण कमी होऊ देणार नाही, असे ठाम मत छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. महात्मा फुले यांचं वाङ्मय सगळ्यांनी वाचले पाहिजे. आज आपल्या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या राज्यात काय सुरू आहे, बजेटमधे काय झाले, मी विचारले सगळ्यांना सारखा न्याय द्यायला पाहिजे, मात्र तो मिळत नाही. म्हणून परत परत भांडावे लागते, तुमचे सहकार्य पाहिजे. ते नसेल तर लढायचे कोणासाठी? असा सवालही यावेळी भुजबळांकडून उपस्थित करण्यात आला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img