राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) उपमपुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात रान पेटलेलंच आहे, दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. पडळकर म्हणाले की, मला अजत पवार अन् जयंत पाटलांच्या भेटीचं काहीही विशेष वाटत नाही. कारण जयंत पाटील लढावू माणूस नाहीये. तर वडिलांच्या रिक्त जागी आल्यामुळं संघर्ष आणि जयंत पाटलांचा काहीही संबंध नाही.
जयंत पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाही, अशी खोचक टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केलीय. पाटलांची सत्तेसाठी लाचार होण्याची तयारी असून ते आता पूर्णपणे शरण आले आहेत, हे लोकांना कळलंय. मी चाळीस हजार मतांनी तर जयंत पाटील (Maharashtra Politics) केवळ अकरा हजार मतांनी निवडून आलेत. जयंत पाटील हे कासेला मोठी परंतु दूध चोरणारी म्हैस आहेत, अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केलीय.
त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी अकराशे कोटी रूपयांची योजना, फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटलांना घरघर लागल्याची टीका देखील पडळकरांनी केली आहे. आता कुठेही त्यांचा प्रभावी गट राहिलेला नसून त्यांची ताकद केवळ इस्लामापूर्तीच मर्यादित आहे. लोकांनी तिथंही जयंत पाटलांना काठावर आणून ठेवलंय, असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढच्या वेळी सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा जरी लढले तरी देखील जयंत पाटलांचा पराभव होवू शकतो, असा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी दिलाय.
जयंत पाटील हे सत्तेशिवाय राहूच शकत नाही. सत्तेसाठी लाचार होण्याची त्यांची तयारी असल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर यावेळी बोलताना ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस यांनी विचार करूनच आणली आहे. पुढे देखील ही योजना सुरू राहणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेवूनच ही योजना आणली आहे. या योजनेसाठी आपल्याकडे सात टक्के खर्च होत असल्याची माहिती देखील गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.