12.5 C
New York

IPL 2025 : मुंबई-चेन्नई सामन्याच्या आधी वेदर रिपोर्टची चिंता

Published:

IPL 2025 च्या १८व्या हंगामाला सुरुवात झाली. काल पहिला सामना RCB विरुद्ध KKr असा रंगला होता. त्यामध्ये RCB ने १७७ रन्स केले. या सामन्यांमध्ये KKr ला अपयश पत्करावे लागेल. हा सामना म. चीनस्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. आज २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग असा सामना ठेवण्यात आला आहे. या सामन्याचे क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. ही मॅच चेन्नईच्या एमए चिदंबरम, चेपॉक स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्या आधी चाहत्यांसाठी दुखत बातमी आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग ही आयपीएल मधील उत्कृष्ठ आणि जास्त काळ यशस्वी झालेली टीम आहे. दोन्ही टीमने ५-५ वेळा ट्रॉफी मिळाली आहे. त्यामुळे जेव्हाही हा सामना रंगतो तेव्हा क्रिकेटप्रेमींचा उत्साह गगनाला भिडतो. पण या सामन्यात पाऊस अडचण आणू शकतो, वेदर रिपोर्ट नुसार ८०% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्याच्या वेळेस २०% पाऊस पडणार याची शक्यता असून २७ ते ३३ डिग्री तापमान राहील याची शक्यता आहे. आज पाऊसाने हजेरी लावली तर ओल्या आऊटफिल्डमुळे सामना उशिराने रंगू शकतो. जर सामन्यावेळी पाऊस पडला तर चाहत्यांना या मॅचचा आनंद लुटता येणार नाही. कालच्या सामन्यावेळी पावसाने अशीच दहशत दाखवली होती. ipl मध्ये मुंबई आणि चेन्नई ही दोन्ही टीम एकूण ३७ वेळेला आमने सामने आली असून मुंबई २० वेळा तर चेन्नई १७ वेळा विजयी झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होणार आहे. पाहणं रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img