5.5 C
New York

Ajit Pawar : जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा, कारण काय? पवारांनी स्पष्टच सांगितलं

Published:

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Ajit Pawar) पक्षावर नाराज असून पक्ष सोडण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. जयंत पाटील लवकरच भाजप (BJP) किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश करणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, एआयबाबत जयंत पाटलांचं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाली मात्र माध्यमांमध्ये वेगळी बातमी सुरु आहे. असं अजित पवार यांनी जयंत पाटील भेटीवर स्पष्टीकरण दिले.

तसेच अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आपण 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक 10 वाजता होती बैठकीला 10-15 मिनिटे असल्याने जयंत पाटील यांचा याबाबत काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही भेटलो होतो मात्र या भेटीबद्दल चुकीच्या बातम्या देण्याचा प्रयत्न सुरु आहे असं माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो, काही कमिटीला येत असतो. असेही अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img