8.6 C
New York

Heavy Rain : सावधान! विजांच्या कडकडाटासह जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा

Published:

राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. मार्च महिन्यातील (Weather Update) रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होत आहे. दुपारच्या वेळेत सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. या कडाक्याच्या उन्हात घरातून बाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. दिलासा देणारी बातमीहीअशी परिस्थिती असतानाच आली आहे. खरंतर उन्हाळ्यात कधी पाऊस होत नाही. उन्हाळ्यात पण हवामानात बदल झाला की पावसाचा अनुभव येतो. आताही दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल जोरदार पाऊस चंद्रपूर आणि लातुरात झाला. गारपिटीचा इशारा आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत देण्यात आला आहे.

विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत गारपीट (Heavy Rain) होईल. मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसामुळे हवामान थंड होणार असले तरी पिकांना (Crop) मात्र फटका बसण्याची शक्यता आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. येत्या 25 मार्चपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहील. नाशिक आणि खानदेश भागात हवामान सामान्य राहील. या स्थितीमुळे येत्या दोन ते तीन दिवसांत तापमानात घट झालेली दिसून येईल.

दरम्यान, राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img