5.6 C
New York

Gold Rate : आठवड्याच्या शेवटी सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

Published:

सोन्या-चांदीच्या दरात सततची वाढ पाहिल्यानंतर अखेर (Gold Rate) आठवड्याच्या शेवटी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंनी किंमतीत आज 22 मार्च 2025 रोजी घट नोंदवत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold Rate सोने 440 रुपयांनी स्वस्त

गेल्या चार दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दराला शुक्रवारी ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने थेट 440 रुपयांनी माघार घेतली. सोमवारपासून गुरुवारपर्यंत सोन्याने उच्चांकी झेप घेतली. प्रत्येकी 440 रुपयांनी मंगळवारी आणि बुधवारी वाढ, तर गुरुवारी 220 रुपयांची वाढ झाली होती. आता गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 82,850 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा दर 90,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Rate आयबीजेए (IBJA) च्या आकडेवारीनुसार

24 कॅरेट – ₹88,169

23 कॅरेट – ₹87,816

22 कॅरेट – ₹80,763

18 कॅरेट – ₹66,127

14 कॅरेट – ₹51,579 प्रति 10 ग्रॅम

Gold Rate चांदी 2100 रुपयांनी घसरली

सोनेप्रमाणेच चांदीनेही गेल्या चार दिवसांत दरवाढ अनुभवली होती. चांदीच्या किमतीत मात्र शुक्रवारी थेट 2100 रुपयांची घट झाली. घसरणीचे संकेत आज सकाळच्या सत्रात देखील मिळत आहेत.

सोमवारी – ₹100 घसरण

मंगळवारी – ₹1100 वाढ

बुधवारी – ₹1000 वाढ

गुरुवारी – ₹100 वाढ

शुक्रवारी – ₹2100 घसरण

आता एक किलो चांदीचा दर ₹1,03,000 इतका आहे (गुडरिटर्न्सनुसार). IBJA नुसार हा दर ₹97,620 प्रति किलो आहे.

Gold Rate घरबसल्या जाणून घ्या किंमती

सोने-चांदीच्या दरांबाबत माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी सरकारने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 8955664433 या क्रमांकावर ग्राहक मिस्ड कॉल देऊन ताजे दर कळवून घेऊ शकतात. IBJA कडून दररोज सुट्टीचे दिवस वगळून दर प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये थोडा फरक राहतो. कर आणि शुल्कांमुळे सराफा बाजारात दर अधिक असतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img