0.2 C
New York

Devendra Fadnavis : ठाकरेंबरोबर भाजप पुन्हा युती करणार? फडणवीसांच्या उत्तराने चर्चांना कायमचा फुलस्टॉप

Published:

राज्यात महायुती सरकार आता स्थिरस्थावर झाले आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांसाठी (Devendra Fadnavis) केलेली जोरदार बॅटिंग पाहता नाराजी नाही असा कयास बांधला जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा युती होणार अशाही चर्चा होत असतात. आता मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे या चर्चांनी जोर धरला आहे. खरंच भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) अगदी स्पष्ट शब्दांत दिलं आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार आहे. मुंबईत आम्ही एकत्रच आहोत. जिथे शक्य होईल तिथे एकत्रच आहोत. मुंबईत एकत्र आहोत हे मात्र पक्के. महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंबाबत अजून तर काहीच निर्णय झालेला नाही. त्यांचा निर्णय तेच घेत असतात. त्या त्यावेळी काय तो विचार केला जाईल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी पुन्हा युती होऊ शकते का? असा सवाल विचारण्यात आला.

राऊतांनी मानसोपचार घ्यावे, सरकार खर्च करेल, फडणवीसांचं प्रत्युत्तर

या देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत नाही.. इतकंच उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरानंतर सभागृहात मात्र टाळ्यांचा कडकडाट झाला. तुमचे लाडके उपमुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला असता दोघेही माझे लाडके आहेत आणि मी सुद्धा त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आता आम्ही लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहोत असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील लाडके कोण असा प्रश्न विचारला असता ठाकरे असे आहेत की आपण त्यांनी लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं. त्यामुळे यात आपण कशाला पडायचं. पण एक सांगतो मागील पाच वर्षांत माझा उद्धव ठाकरे यांच्याशी काहीच संबंध राहिलेला नाही. माझा राज ठाकरेंशी संबंध राहिलाय. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडले. समोर आले की आम्ही नमस्कार करतो चांगले बोलतोही पण आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संबंध राहिलेले नाहीत असे उत्तर फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत दिले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img