बॉलीवूडचा (Bollywood ) भाईजान दबंग सलमान खानने (Salman Khan) अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. भाईजानचे चाहते नेहमीच नव्या चित्रपटाची वाट पाहत असतात. आता लवकरच भाईजानचा नवा-कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे. आजच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने स्वतः सोशल मीडियावर तलवार हाथामध्ये धरून फोटो पोस्ट केला आहे. “३० मार्च रोजी वर्ल्डवाइल्ड थिएटरमध्ये भेटूया असे त्याने कॅप्शनमध्ये लिहलं आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानसह रश्मीका मंदाना, काजल अग्रवाल, प्रतीक बाबर, साथयराज इत्यादी कलाकार दिसून येणार आहे. अशी दमदार कास्ट असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय धमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसं पाहायला गेलं तर चित्रपट हे शुक्रवारी प्रदर्शित होत असतात. पण ३० मार्चला रविवार आहे आणि त्याचबरोबर मराठी माणसांचा गुढीपाडवा सण आणि उगादी आहे. हे दोन्ही सण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात उत्साहाने नव्या वर्षाचे स्वागत म्हणून साजरे केले जातात. पण सिकंदर रविवार प्रदर्शित न होता शुक्रवारी प्रदर्शित झाला असता तर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जास्त झाले असते. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए .आर. मुरुगादास यांनी केले आहे. साजिद नाडियावाल प्रोडक्शनच्या निर्मात्याने हा चित्रपट रविवार प्रदर्शित करण्याचा का निर्णय घेतला असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.