6.7 C
New York

Modi Government : 1 एप्रिलपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन योजना

Published:

मोदी सरकार 1 एप्रिल 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना युनिफाइड पेन्शन योजना (Unified Pension Scheme) लागू करणार आहे. या योजनेचा फायदा देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. युनिफाइड पेन्शन योजना एक नवीन एकत्रित पेन्शन योजना आहे. या योजनेता उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन सुरक्षा प्रदान करणे आहे.

सरकारने (Modi Government) दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन योजना राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील केंद्रीय कर्मचारी असाल आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेचा (National Pension Scheme) लाभ घेत असाल तर तुम्ही देखील युनिफाइड पेन्शन योजना म्हणजेच यूपीएस (UPS) योजना निवडू शकतात.

Modi Government मिळणार कर्मचाऱ्यांना पेन्शनची हमी

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, युनिफाइड पेन्शन योजनेत 25 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के पेन्शन हमी मिळणार आहे. तर दुसरीकडे जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केली असेल तर त्याला दरमहा किमान 10,000 रुपये पेन्शन मिळणार. याच बरोबर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला शेवटच्या पेन्शन रकमेच्या 60 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

Modi Government युनिफाइड पेन्शन योजना काम कशी करणार ?

केंद्र सरकारने 2004 मध्ये ओल्ड पेन्शन योजना बंद करून राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती मात्र 2009 मध्ये ही योजना सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत आता युनिफाइड पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक निश्चित रक्कम कापली जाते आणि ती बाजार आधारित गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवली जाते. निवृत्तीच्या वेळी, 60 टक्के रक्कम एकरकमी मिळते, तर 40 टक्के रक्कम गुंतवावी लागते, जी दरमहा पेन्शनच्या स्वरूपात मिळते.

तर दुसरीकडे जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेवर पेन्शनच्या स्वरूपात कोणत्याही निश्चित रकमेची हमी नाही. या योजनांअंतर्गत दिले जाणारे पेन्शन शेअर बाजार आणि इतर गुंतवणुकीच्या कामगिरीवर आधारित असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img