10.3 C
New York

Govt Employee Retirement : कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढणार? केंद्राने केले स्पष्ट

Published:

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात बदल करून ते वाढविण्यात येणार (Govt Employee Retirement) असल्याची चर्चा मधल्या काळात रंगली होती. याच पार्श्वभूमीवर, सरकारने लोकसभेत याबाबतची भूमिका स्पष्ट करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्याचबरोबर नव्या भरतीच्या धोरणाबाबतही केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती दिली आहे. (Government’s stand on retirement age of employees is clear)

लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात बुधवारी सरकारी निवृत्तीच्या वयाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. एखाद्या सरकारी कर्मचारी संघ किंवा संघटनेने निवृत्तीचे वय बदलण्याची मागणी केली आहे का, अशी विचारणा सरकारकडे करण्यात आली होती. त्यावर, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी, राष्ट्रीय संघटना किंवा कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचा कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याच्या सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त जागा भरण्याबाबत सरकारचे कोणतेही धोरण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट व्हायरल झाली. केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय सध्याच्या 60 वर्षांवरून 62 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे, जो 1 एप्रिल 2025पासून लागू होईल, असा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला होता. तथापि, त्यावेळीही पीआयबीने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले होते.

केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या तपशीलांबद्दल आणि त्यांच्या निवृत्तीच्या वयातील तफावतीची कारणे विचारली असता, जितेंद्र सिंह म्हणाले की, हा विषय राज्यांच्या अखत्यारित येत असल्याने केंद्र सरकारकडून असा कोणताही डेटा ठेवला जात नाही.

Govt Employee Retirement वृद्धांना अतिरिक्त पेन्शन

वृद्ध पेन्शनधारकांना चांगल्या सुविधांची आवश्यकता असल्याने त्यांना अतिरिक्त पेन्शन दिली जाते. विशेषतः, आरोग्य आणि वाढते वय या दृष्टीने त्यांच्या गरजा वाढतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अन्य एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. पेन्शनधारक तसेच कुटुंब पेन्शनधारक पात्र झाल्यावर आपोआपच पेन्शन वितरण प्राधिकरण, बँका यांच्या माध्यमातून त्यांना अतिरिक्त पेन्शन दिली जाते, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img