आज २० मार्च क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा हे (Chahal and Dhanashree Divorce) दोघे एकेमकांपासून अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून घटस्पोटाच्या चर्चा सुरु होती. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा २२ डिसेंबर २०२० रोजी लग्नबंधनात अडकले होते. गेल्या दोन वर्षांपासून दोघे वेगळे राहत आहेत. २१ मार्च पासून चहल उपलब्ध नसल्यामुळे न्यायालयाने त्यावर आजच निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मध्यस्थतीने पोटगीच्या निर्णय देखील घेतला आहे. काहीदिवसांपूर्वी धनश्रीने चहलकाडे ६० कोटींची मागणी केली होती पण ही बातमी खोटी आहे. या अफवांना काहीही तथ्य नाही, एवढ्या पैशांची मागणी कधीच केली नव्हती असे कुटुंबीयांनी सांगितले. चहलने धनश्रीला ४. ७५ देण्याचे मजूर केले आहे. २०२४ फेब्रुवारीमध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर ६ महिन्यचा कूलिंग ऑफ करण्याची विनंती देखील केली. चहलने धनश्रीला २. ३७ कोटी आधीच दिले होते. यानंतर उर्वरित पोटगीची रक्कम घटस्पोटाच्या आदेशनंतर देण्यात येणार आहे.
त्याचदरम्यान आता आरजे महावशने सोशल मीडिया अकाउंटवर काही दमदार फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये व्हाईट रेड हार्ट कलरच्या ड्रेसमध्ये दिसून आली आहे. फोटोच बरोबर तिच्या कॅप्शनने देखील लक्ष वेधून घेते आहे. ”झूठ, लालच और फरेब से परे है…. खुदा का शुक्र है आज भी खडे है….” असं कॅप्शन टाकला आहे. पोस्ट करताच सोशल मीडियावर हि पोस्ट चांगलीच वायरल झाली आहे. पोस्ट केल्यानंतर युजवेंद्र चहल ने १० सेकेंमध्ये लाइक केली आहे. नेटकरांनी त्या पोस्टवर कंमेंट करायला देखील सुरुवात केली आहे. चहल आता आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहे असं एका नेटकऱ्यानी गमतीने कंमेंट केली आहे. फोटो पोस्ट होताच चहलन लगेच लाइक केली आहे. असं एका नेटकाऱ्यानी म्हंटल आहे.