बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेते कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या कार्तिक आर्यन आणि श्रीलीला (Shreelela) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चेत उधाण आलं आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aryan) हा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यानंपैकी एक आहे. त्याचबरोबर त्याचे जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. स्वताचे ट्यालेंट दाखवून बॉलीवूड चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. कार्तिक आर्यनने भूल भूलभुलैया, सत्यप्रेम कि कथा, चंदू चॅम्पियन, लुका चुप्पी सारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. कार्तिक आर्यनला अभिनेत्याच्या श्रेणीत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चंदू चॅम्पियन या चित्रपटामधील मुरलीकांत पेटकरची भूमिका साकारली होती.
अलीकडचे एका शो दरम्यान कार्तिक आर्यनच्या आईला तुम्हाला कशी सून हवी आहे? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, मला एक डॉक्टर सून हवी आहे. या उत्तराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रीलीला एमबीबीएसचे शिक्षण घेत असून ती चित्रपटांमध्ये देखील काम करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर कार्तिक आणि श्रीलीलाचे काही पार्टीमधील व्हिडिओ देखील वायरल होत आहेत. कार्तिक आणि श्रीलीला यांचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.
श्रीलीलाने आतापर्यंत कन्नड, तेलुगू या भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रीलीलाने सुरुवातीच्या काळात ४ लाख इतके मानधन घेते होते. सध्या ती एका चित्रपटाचे ४ कोटीपर्यंतचे मानधन घेत आहे. या अभिनेत्रीने दोन मुलांना दत्तक घेतले असून ती दोन मुलांचे पालन-पोषण करत आहे. श्रीलीलाची एकूण संपत्ती हि १५ कोटींच्या आसपास आहे आणि ती सध्या तीच आलिशान आयुष्य जगत आहे.