9.9 C
New York

Aditya Thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

Published:

तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील आरोप केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आणखी तीन अभिनेत्यांचे नाव घेत चौकशीची मागणी केली आहे.

तर आता या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या पाच वर्षात बदनामी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. आम्ही न्यायालयात उत्तर देऊ. असं माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 5 वर्षांपासून बदनामीतचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच या प्रकरणात कोर्टात बोलावलं कोर्टात बोलू, होईल ते होईल असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray अंत्यविधीवेळचे फोटो व्हायरल

तर दुसरीकडे आता बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) अंत्यविधीवेळचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

दिशा सालियनचा 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता मात्र आता अंत्यविधीचे फोटो दुसरचं काही सांगत असल्याचा दावा दिशा सालियनच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप दिशा सालियनच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता मात्र गेल्या पाच वर्षात दिशा सालियनचा एकही फोटो समोर आला नव्हता. मात्र आता अंत्यविधी होतानाचे दोन फोटो समोर आले आहे आणि या फोटोमध्ये दिशाचा चेहरा स्पष्टपणे दिसत असल्याने कुटूंबियांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img