”सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेतून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ”गिरीजा प्रभू” पुन्हा एकदा एका नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’! (Kon Hotis Too Kaay Jhalis Too) असे या मालिकेचे नाव असणार आहे.’ कावेरी सावंत’ या पत्राचे नाव असणार आहे. या भूमिकेबद्दल गिरीजा म्हणाली, स्टार प्रवाह हि माझी लाडकी वाहिनी आहे. मला पुन्हा एकदा नवं पात्र साकारायला दिल्या बद्दल मी स्टार प्रवाहाचे आभार मानते.
कावेरी ही भूमिका वेगळी आहे. बिनधास्त, अतिशय हुशार अशी व्यक्तिरेखा मी साकारत आहे. मालिकेची गोष्ट ही कोकणातली असून मी कोकणी भाषा सुद्धा शिकत आहे. मालिकेमध्ये वैभव मांगले हे माझ्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. कावेरी तिच्या वडिलांवर खूप प्रेम करत असते. ती नेहमी वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. या मालिकेत बाप- लेकीचं अनोखं प्रेम पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत प्रेक्षकांनी गौरी आणि नित्या या दोन व्यक्तिरेखांवर भरभरून प्रेम केलं तसंच प्रेम कावेरीवर कराल अशी खात्री आहे.स्टार प्रहवाहने नुकतीच ‘कोण होतीस, तू काय झालीस तू’! या मालिकेची घोषणा केली आहे. त्यानंतर या मालिकेचा प्रोमोसुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे.
या प्रोमोमध्ये कावेरीची वडील आणि बहिणी भावोजी तिला शोधत असतात. कावेरी माडावर चडून नारळ काढत असते. कावेरीच्या बहिणीला सासूने पुन्हा सासरी बोलावले आहे असे तिचे वडील सांगत असतात. हे सर्व ऐकून कावेरी खूप खुश होते. हे सर्व बहिणींच्या लहानमुलामुळे शक्य झाले आहे असे कावेरी सांगत असते. तिच्यापासून तिचा लाडका भाचा दूर होणार हे कळताच ती निराश होते. तेवढ्यात तिची बहीण तू सुद्धा मुंबईला चल. ”तू माझ्या बाळाची दुसरी आहे आहेस” असे ती सांगते. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या मालिकेत गिरीजा प्रभूसह, वैभव मांगले, अमृता माळवदकर आणि अमित खेडेकर हे देखील भूमिका साकारत आहेत