8.9 C
New York

Best MLA of the Year : दरवर्षी घोषित होणार ‘बेस्ट आमदार ऑफ द इअर’; विधानसभा अध्यक्षांची घोषणा

Published:

राज्याच्या विधानभवनात जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना ज्याप्रमाणे त्यांच्या मतदार संघातील कामाची पोच पावती जनतेकडून मिळते. तसेच आता आमदारांना त्यांच्या विधान भवनातील कामगिरीसाठी देखील कौतुकाची थाप मिळणार आहे. कारण आता आमदारांसाठी दिला जाणारा ‘बेस्ट आमदार ऑफ द इअर’ (Best MLA of the Year) हा पुरस्कार दरवर्षी घोषित केला जाणार आहे. त्यामुळे आता आमदारांना जर हा पुरस्कार पटकवायचा असेल तर त्यांना त्यासाठी लागणाऱ्या निकषांमध्ये बसावे लागणार आहे.

Best MLA of the Year पुरस्कारासाठी पूर्ण करावे लागणार निकष

तर या पुरस्कारासाठी आमदारांना निवडण्यासाठी काही निकष लावण्यात आले आहेत. त्यामध्ये हा पुरस्कार देताना संबंधित आमदारांची सभागृहातील उपस्थिती, सभागृहातील कामकाजामध्ये त्यांनी दिलेले अर्थपुर्ण योगदान, त्यांनी केलेल्या भाषणाची गुणवत्ता तसेच सभागृहात सादर झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत त्यांनी कशा प्रकारे सहभाग घेतला? या सर्व बाबी तपासून आमदारांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे आता हा पुरस्कार दरवर्षी घोषित केला जाणार आहे. अशी महत्त्वाची घोषणा दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी केली आहे.

त्यामुळे आता दिल्ली विधानसभेमध्ये आमदारांसाठी हा एक महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार आता दिल्ली विधानसभेच्या आमदारांना दरवर्षी ‘बेस्ट आमदार ऑफ द इअर’ हा पुरस्कार पटकावण्याची संधी मिळणार आहे. ज्या प्रमाणे संसदेमध्ये संसदरत्न खासदार हा पुरस्कार दिला जातो. त्याच धर्तीवर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर संसदरत्न खासदार हा पुरस्कार माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मागणीवरून प्राइम प्वाइंट फाउंडेशन या संस्थेने 2010 पासून सुरू केला आहे. तर कलाम यांच्याच हस्त या पुरस्काराचं उद्धाटन करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img