9.1 C
New York

Eknath Shinde : लाज वाटायला हवी, एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा

Published:

हिंदूंवर अनन्वित ज्या औरंगजेबाने अत्याचार केले, त्याची तुलना तुम्ही राज्याच्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करता ? आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन राज्य चालवतो,सर्वसामान्य लोकांना न्याया देण्याचं काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना आम्ही अनेक योजना सुरू केल्या, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या, या राज्याला विकासाकडे नेलं. अडीच वर्ष आम्ही काम केलं, त्याची पोचपावती म्हणून जननेते आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिलं. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत Eknath Shinde आहोत.

सुखी समाधानी या राज्यातल्या जनतेला करण्याचा आमचा अजेंडा आहे. कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस हे ? अशी तुलना करण्यापूर्वी त्यांना जनाची नाही तर मनाची तर ( लाज वाटायला) पाहिजे होती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा साधला. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

जेवढा क्रूर शासक औरंगजेब होता, फडणवीस आज सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. नेहमी धर्माचा आधार घेतात” असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले.

Eknath Shinde औरंगजेब यांचा कोण लागतो ?

मुघल शासक असलेला औरंगजेब हा महाराष्ट्राचा घास घ्यायला, महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला आला होता. त्याचं समर्थन करणारा कोणीही असेल, त्याला सोडण्यात येणार नाही. या देशातील सच्चा मुसलमान जो आहे, तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही. मग हे समर्थन का करत आहेत ? मग यांचा औरंगजेब कोण लागतो ? नातेवाईक लागतोय की सगासोयरा लागतो का आणखी कोण लागतोय ?असा तिखट सवाल शिंदे यांनी विचारला. औरंगजेब हा देशद्रोही आहे, तो राष्ट्रद्रोही आहे. महाराष्ट्रातील, देशभक्त जनता ही त्याला सहन करणार नाही असेही शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर या मुद्यावरून राज्यातलं रान पेटलं असून ती कबर उखडून काढा असं सत्ताधारी पक्षातील अनेकांचं म्हणणं आहे. याच कबरीच्या मुद्यावरून काल नागपुरात हिंसा , दगडफेक झाली, पोलिसही जखमी झाले. सध्या शहरात तणाव असून संचारबंदीही लागू करण्यात आली. एकीकडे या मुद्यावरून वातावरण तापलं आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमत्री फणडणवीसांवर टीका करताना त्यांची औरंगजेबाशी तुलना केल्याने आणखीनच वाद चिघधळला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यातच आता हे विधान केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img