2.9 C
New York

Uddhav Thackeray : तुम्ही दळभद्री उद्योग बंद करा; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना आवाहन

Published:

छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. महाराजांच्या जयंती दिनापासून राज्यातील काही हिंदूत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिला आहे. काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्या प्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्धस्त करु. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषेरी करायचे आहे. स्वतःला हिंदू-तालिबानी म्हणून मिरवायचे आहे असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत! असे आवाहन शिवसेनेने (ठाकरे) केले आहे.

Uddhav Thackeray औरंगजेबाची कबर महाराजांच्या झुंजार पराक्रमाचे स्मारक


औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या दोन्ही संघटनांकडून आज राज्यभरात जिल्हा परिषद आणि तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. याचा विरोध
शिवसेना ठाकरे गटाने मुखपत्र दैनिक सामनाच्या माध्यमातून केला आहे. ‘शिवरायांना हे पटेल का?’ या शिर्षकाने लिहिलेल्या अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले आहे की, ‘मराठी जीवनाशी, महाराष्ट्राच्या मातीशी, देशाच्या भाग्याशी इतके एकरुप झालेले शिवाजीराजांसारखे दुसरे व्यक्तिमत्व नसेल. छत्रपती महाराष्ट्रात जन्मास आले हे महाराष्ट्राचे भाग्य. महाराजांनी तलवारीच्या जोरावर ‘स्वराज्य’ निर्माण केले व जे त्यांच्या तलवारीस भिडले ते याच मातीत गाडले. त्यातला एक बादशहा औरंजेब. औरंगजेबाजी कबर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, झुंजार पराक्रमाचे स्मारक आहे. ही ‘कबर’ हटवा नाहीतर आम्ही ती उद्धवस्त करु अशी भूमिका भाजप किंवा संघ पुरस्कृत काही माथेफिरू धर्मवेड्यांनी घेतली.’ अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

ठाकरे गटाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीसंबंधीची एक आठवण या अग्रलेखात सांगितली आहे. त्या म्हटले आहे की, महाराष्ट्राबद्दल जेव्हा केंद्राकडे उलट-सुलट तक्रारी अंधभक्तांकडून केल्या जात होत्या तेव्हा, त्यांना सांगितले जात होते की, ‘महाराष्ट्राबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) जाऊन औरंगजेबाचे थडगे पाहून या. औरंगजेबाचे थडगे हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या जिद्दीचे आणि मोगलांच्या पराभवाचे हे थडगे आहे.’ असे ठाकरेंनी सामनातून म्हटले आहे.

Uddhav Thackeray हिंदू तालिबानी


‘औरंगजेब आणि अफझलखानाची थडगी महाराष्ट्रातच आहेत. शौऱ्याची स्मारके म्हणून त्याकडे पाहायला हवे. काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की ज्या प्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्धवस्त करु. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्य परंपरचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचे आहे. व स्वतःला हिंदू-तालिबानी म्हणून मिरवायचे आहे. हिंदुत्वाचे विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वरजाच्याचाही ते अपमान करीत आहेत. शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी 25 वर्षे दुश्मनांना कसे झुंजवले? महाराष्ट्राच्या स्वाभीमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत!’ असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाने केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img