10.2 C
New York

Ajit Pawar : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नावाची घोषणा

Published:

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) संजय खोडके (Sanjay Khodke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय खोडके अजित पवारांचे (Ajit Pawar) निकटवर्तीय असल्याने त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकी (Zishan Siddiqui) किंवा उमेश पाटील (Umesh Patil) पैकी एकाला संधी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात सुरु होती.

विधान परिषदेच्या पाचही उमेदवारांची घोषणा महायुतीकडून झाली आहे. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. माहितीनुसार, जिशान सिद्दीकी यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे निकटवर्तीय संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारांना 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर 18 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 20 मार्च रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img