13.3 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

अवैध गर्भपात प्रकरण, चार डॉक्टरांना अटक

राज्यात १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत गर्भपाताच्या औषधांच्या गैरवापराची पाच प्रकरणे आढळली असून जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा आदी विविध ठिकाणी २४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात चार डॉक्टरांचाही समावेश असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी अधिवेशनादरम्यान दिली आहे.

खुलताबादमध्ये तणावपूर्ण शांतता

औरंगजेब कबर परिसरात ‘एसआरपीएफ’चे ११५ शस्त्रधारी जवान, दंगल नियंत्रण पथकातील २५ पोलिस जवान, ६० पोलिस अंमलदार, महिला पोलिस, भारतीय पुरातत्त्व विभागाचे खासगी सुरक्षारक्षक असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. औरंगजेब कबर परिसरातील रस्त्यावर दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, औरंगजेब कबर पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची नोंद केली जात आहे.

राज्यात तापमानाचा पारा वाढता

राज्यात तापमानाचा पारा सतत चढा असताना राज्यातील प्रमुख ३२ धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा व सरासरीहून अधिक जलसाठा असला तरीही त्यात मागील १५ दिवसांत सात टक्क्यांची घट झाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला

हुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असे संकेत यापूर्वी मिळालेले असतानाच या विमानतळासाठी आता जूनचा मुहूर्त मिळाल्याचे दिसत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पस्थळी भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला व प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. जून २०२५मध्ये नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन प्रस्तावित असल्याचे अदानी समूहातर्फे यानंतर सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img