देशात तणाव पसरवणे भाजपाचे काम आहे. (BJP) भाजपात नवहिंदुत्व सुरू झालंय. महाराष्ट्रातील मंत्री इफ्तार पार्ट्यांना विरोध करत आहेत. राज्यात दोन वर्षात ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल सरकार बोलत नाहीये, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे कोणीही लक्ष देत नाहीये. पाकिस्तानच्या निर्मितीवेळी काही लोकांनी अशीच स्थिती निर्माण केली होती. देशात तणाव पसरवणे हे भाजपाचे काम आहे असा थेट आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि देशातील हालत तुम्हीच बघा. हिंदूस्थानात हिंदू आणि मुस्लीम अशी दोन राज्य बघायला मिळत आहेत. देश विभाजणाकडे जात आहे. नेहरू म्हणाले होते की, भारताचा कधीच पाकिस्तान होऊ देणार नाही. काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. कोकणात कधीही दंगली घडल्या नव्हता. मोहन भागवत कधीही महागाई आणि बेरोजगारी यावर बोलत नाहीत. आम्ही लोकांच्या पोटावर बोलतो तुम्ही हिंदूत्वावर बोलता.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मुस्लिमांना वेगळी दुकान, इतरांना वेगळी दुकानं असं कसं चालेल. तणाव पसरावा आणि दंगली देशात व्हाव्यात ही मोदींची इच्छा असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. हिंदू मुस्लिमांनी एकत्र काम करायला हवे, असे मोहन भागवत नेहमीच म्हणतात. मात्र, हे अंमलात कोण आणणार? बीजेपी तर त्यांचीच पार्टी आहे ना?. यावेळी संजय राऊत हे मोहन भागवत यांच्यावरही टीका करताना दिसले.
हलाल आणि झटके यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचे कबरींना रक्षण आहे. दंगली घडवणे, मशिदीवर हल्ला करणे, हिंदू तरूणांची डोकी भडकवणे हेच यांचे काम आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, यावर मात्र कोणालीही बोलायचे नसल्याचे म्हणताना संजय राऊत दिसले. संजय राऊत यांनी काल एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. ज्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापमान देखील दिसले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर भाष्य करणे टाळले.