राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीमध्ये आज पत्रकरारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले. मात्र एका प्रश्नावर शरद पवार पत्रकारावर भडकले. हा काय प्रश्न आहे? काय प्रश्व विचारावं याचं तारतम्य तर ठेवा, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. बारामतीमध्ये (Baramati) शरद पवार आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या राजकारणावर देखील प्रतिक्रिया दिली.
यावेळी शरद पवार म्हणाले की, बीड जिल्ह्याला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. आज जी अवस्था आहे. ती कधीच नव्हती. सर्व घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा हा माझा अनुभव आहे. मी स्वत: त्या भागावर लक्ष देत होतो. मी बीडबाबत निर्णय घेतले आहेत. सहा सदस्य तिथून आमदार म्हणून निवडून आणले आहेत. बीडमध्ये काही दुष्परिणाम दिसत आहेत. माझं स्वच्छ मत आहे कोण आहेत याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, त्यांच्या विरोधात सख्त धोरण आखावं.असं शरद पवार म्हणाले.
तसेच यावेळी एका पत्रकाराने जय पवार (Jay Pawar) यांच्या साखरपुड्याबद्दल प्रश्न विचारला असता शरद पवार पत्रकारांवर चिडले. हा काय प्रश्न आहे? काय प्रश्व विचारावं याचं तारतम्य तर ठेवा, असं यावेळी शरद पवार म्हणाले. तुम्ही जय पवारच्या साखरपुड्याला जाणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता.
Sharad Pawar हे राष्ट्रीय प्रश्न नाहीत
राज्यात सध्या मल्हार आणि झटाका वाद निर्माण झाला आहे. याला जेजुरीच्या विश्वस्तांनी पाठिंबा देखील दिला आहे. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही? हे राष्ट्रीय प्रश्न नाहीत. असं शरद पवार म्हणाले.