दुबईत झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy) भारतीय संघाने शानदार कामगिरी करत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. तर आता सर्वांचे लक्ष बीसीसीआयकडे (BCCI) लागले आहे. माहितीनुसार, बीसीसीआय पुढील काही दिवसात सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Central Contracts) जाहीर करणार आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये बीसीसीआय कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 2025-26 साठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बीसीसीआय भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) धक्का देऊ शकतो. तिन्ही खेळाडू सध्या ए प्लस (A+) ग्रेडमध्ये आहे मात्र आता त्यांच्या ग्रेडमध्ये बदल करण्यात येऊ शकतो. जर असं झालं तर रोहित- विराट आणि जाडेजाला कोट्यवधींचे होण्याची शक्यता आहे.
या तिन्ही खेळाडूंनी 2024 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तर बीसीसीआयच्या नियमांनुसार जे खेळाडू कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात त्या खेळांडूना ए प्लस ग्रेडमध्ये स्थान दिले जाते. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंचे ग्रेड आता बदलणार आहे.
BCCI ग्रेडनुसार पगार
बीसीसीआय ग्रेडनुसार पगार देते त्यामुळे रोहित, विराट आणि जाडेजाला आर्थिक नुकसान होणार आहे. बीसीसीआय ए प्लस ग्रेड खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी रुपये देते. तर ग्रेड अ खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये देण्यात येते. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना कमीत कमी 2 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
BCCI A+ ग्रेडमध्ये फक्त चार खेळाडू
बीसीसीआयच्या सध्याच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ए प्लस ग्रेडमध्ये फक्त चार खेळाडू आहेत. त्यात रोहित, विराट आणि जडेजासह जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. तर ग्रेड ए मध्ये सहा खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या आणि रविचंद्रन अश्विनचा समावेश आहे. तर ग्रेड बी मध्ये ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादवचा समावेश आहे.
BCCI गिल-जैसवाल-पंतला लागणार जॅकपॉट
A+ ग्रेडमध्ये भारतासाठी सध्या जसप्रीत बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्यामुळे एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांना A+ ग्रेडमध्ये स्थान मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.