11.7 C
New York

Sanjay Raut : तुमचा कार्यकाळ औरंगजेबापेक्षा खूप खराब, राऊतांनी टोचले सरकारचे कान

Published:

आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. आज होळी आहे, महत्वाचा सण आहे. अनेक वर्ष आम्ही हा सण एकत्र येवून साजरा करत होतो. सर्व राजकीय पक्षाचे अन् धर्माचे लोक यामध्ये सहभागी व्हायचे. आमची प्रतिमा जगभरात सहिष्णु आहे. त्यामुळे जगभरात हिंदु धर्माला मान आहे. दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून (Fadnavis Government) भारतीय संस्कृतीची ओळख मिटत आहे, अशी चिंता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलीय.

खासदार संजय राऊत यांनी देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावर कठोर टीका केलीय. होळीला देशात मशिदी झाकून ठेवायची. त्यांच्यावर अच्छादन टाकायची वेळ आलीय. हा संकुचितपणा देशाला परवडणारा (Farmer Death) नाही, असा टोला संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे. यावेळी त्यांनी राजकीय धुळवडीवर मंथन केलंय. देशाचा माहौल बिघडत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी सरकारवर केलाय.

‘दोघांना मुख्यमंत्री बनवू’; नाना पटोलेंची कोणालाऑफर

औरंगजेबच्या मृत्यूला चारशे वर्ष झाली, विसरून जावा. शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहे. ते औरंगजेबमुळे आत्महत्या करत आहेत का? तो तुमच्यामुळे आत्महत्या करत आहे. औरंगजेबने अन्याय आणि (Maharashtra Politics) अत्याचार केला असेल, तर तुम्ही लोकं काय करत आहात? शेतकरी मरत आहे. औरंगजेबचा कार्यकाळ झालाय. पण तुमचा कार्यकाळ हा औरंगजेबापेक्षा देखील खूप खराब आहे. शेतकरी, बेरोजगार आणि महिला देखील आत्महत्या करत असल्याचा टोला संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे.

शेतकरी आत्महत्या अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे सरकार बोलत आहे, घोषणा करत आहे. पण प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती काय? राज्य प्रगतीपथावर नसून हे राज्य अधोगतीला लागलं आहे. महाराष्ट्रात रोज आणि देशात रोज 22 शेतकरी आत्महत्या करतात, अशी या देशाची राज्याची परिस्थिती आहे. नरेंद्र मोदी गंगाजल कुंभ घेऊन जगभरात फिरत आहेत. आज मॉरिशस , नेपाळ परवा म्यानमार फिरत आहेत, पण शेतकरी मरत आहेत, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img