राज्यात आज धुळवडीचा सण साजरा होत आहे. लहान – थोर सर्वच विविध रंगात रंगून गेले आहेत. (Bacchu Kadu) अशातच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवा राजकीय रंग उधळला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससोबत यावे, आम्ही दोघांनाही आळीपाळीने मुख्यमंत्री करतो, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेसच्या या ऑफरवर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अजून प्रत्यत्तर दिले नाही मात्र प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे नेते ऑफरसाठी काम करत नसल्याचा टोला नाना पटोलेंना लगावला आहे.
Bacchu Kadu काँग्रेस कुठंय ते शोधा, बच्चू कडूंचा टोला
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले की, नानाभाऊंची ही ऑफरच मोठी हास्यास्पद आहे. काँग्रेसच सध्या स्थिर आहे की नाही हे समजत नाही. काँग्रेसचे 20 आमदार आहेत, तर एक तर आताच शिंदे गटात गेले आहेत. नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे. पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
Bacchu Kadu जनतेचा विश्वास पुन्हा मिळवा…
नाना पटोले यांच्या ऑफरवर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या पक्षाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र महायुतीतीतल प्रमुख घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, महायुतीचे नेते ऑफरसाठी काम करत नाहीत. काँग्रेसने पुन्हा जनतेचा विश्वास मिळवावा, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना दिला आहे.
Bacchu Kadu शिंदेंना सोबत घेतल्यानंतर काँग्रेस ठाकरेंचे काय करणार?
नाना पटोले यांनी होळीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ही ऑफर दिली असली तरी शिवसेना ठाकरे गटाच्या सहभागाशिवाय नाना पटोलेंचा प्रयोग पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर ठाकरे गटाचे काय करणार हे त्यांनी सांगितलेले नाही, अशीही चर्चा होत आहे.