ओतूर Otur ,प्रतिनिधी:दि.१५ मार्च ( रमेश तांबे )
ओतूर पोलीस स्टेशन हद्दितील ओतूर, रोहोकडी, खामुंडी परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीरीमधील विद्युत मोटारीचे केबल चोरी संदर्भात ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असून, सदर गुन्ह्याचा तपास करत असताना,विद्युत मोटारींच्या केबल चोरी करणारे आरोपी तसेच चोरीचा माल विकत घेणाऱ्या दोन भंगार व्यवसायिकांसह एकुण सहा आरोपींच्या ओतूर पोलीसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून,आरोपींकडून दोन दिवसातील सह दुचाकीन सह दुचाकीसह एक लाख १४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे यांनी दिली.
१) केशव बबन काळे, रा. कुरकुंडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, २) किशोर सुरेश काळे, रा. भोजदरी, संगगनेर, जि.अहिल्यानगर, ३) राहुल विठ्ठल काळे, रा. भोजदरी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर व ४ ) दिपक तात्याबा डोके, रा. सावरचोळ, ता. संगमनेर,जि.अहिल्यानगर
तसेच भंगार व्यावसायीक सोबरन राजाराम चौहान, रा. घारगाव, ता. संगमनेर, जि.अहिल्यानगर मुळ रा. मध्यप्रदेश व मेटल खरेदी व्यावसायीक विक्रमसिंग अमरसिंग राठोड, रा.आळेफाटा, मुळ रा. राजस्थान अशी अटक केलेला आरोपींची नावे असल्याचे श्री थाटे यांनी सांगीतले.
या आरोपींवर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, ओतूर तसेच अहिल्यानगर येथील घारगाव पोलीस स्टेशन येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपीकडून ९ हजार रूपये किंमतीचे विद्युत मोटरीचे केबल जाळुन त्यातुन काढलेल्या १८ किलो वजनाच्या थातुच्या तारा, ५ हजार रूपये किंमतीच्या विद्युत मोटारीचे काळे केबल, १०० रूपये किंमतीचे एक कटर, तसेच सदर गुन्हा करताना वापरलेली १ )
५० हजार रूपये किंमतीची बजाज पल्सर नं.एम. एच.१५.ई.सी.७२४८ व २) ५० हजार रूपये किंमतीची बजाज पल्सर नं. एम.एच.१२.एस.पी.६८४१ असा एकुण १,१४,१०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
आरोपींवर ओतूर पोलीस स्टेशन येथे पोस्को कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्याचेकडे अधिक तपास करता तसेच त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करता त्याने त्याचे साथीदारांचे मदतीने ओतुर पोलीस स्टेशन हद्दित मौजे ओतुर, रोहकडी, खामुंडी परिसरातील शेतकरी यांचे शेतजमीन विहीरीमधील विद्युत मोटारीचे केबल चोरी केल्या असल्याचे श्री थाटे यांनी सांगितले.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. लहु थाटे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदिप आमणे,पो.हवा. महेश पटारे,पो.हवा.बाळशीराम भवारी,पो.हवा.नामदेव बांबळे, पो.हवा.नदीम तडवी, पो.कॉ.विशाल गोडसे, पो.कॉ.सुभाष केदारी, पो.कॉ.शामसुंदर जायभाये, होमगार्ड ईश्वर,भवारी,पोलीस पाटील किरण भोर, पोलीस मित्र विठ्ठल डोंगरे यांनी केली आहे.