भारतासह जगभरातील बाजारपेठा (Share Market) सध्या घसरणीच्या काळात आहेत. भू-राजकीय तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा परिणाम दिसून येतोय. दरम्यान, मॉर्गन स्टॅनलीने असा विश्वास व्यक्त केलाय की, डिसेंबर 2025 पर्यंत भारतीय बाजार तेजीत येईल, सेन्सेक्स (Sensex) 105,000 पर्यंत पोहोचेल. हे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 41 टक्के जास्त आहे. मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley Report) ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी आहे.
मॉर्गन स्टॅनलीने म्हटलंय की, भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकते. सेन्सेक्स डिसेंबर 2025 पर्यंत 93,00 च्या पातळीला स्पर्श करेल. ही पातळी सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 25 टक्के जास्त (Stock Market) आहे. मंदीच्या परिस्थितीत, वर्षाच्या अखेरीस सेन्सेक्स 70,000 च्या पातळीवर घसरू शकतो. हे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 6 टक्के कमी आहे.
मॉर्गन स्टॅनलीचे प्रमुख (इंडिया रिसर्च अँड इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी) रिधम देसाई यांनी अलीकडील एका अहवालात म्हटलंय की, भारतीय इक्विटी बाजार जास्त विक्री झालेला दिसतोय. त्यामुळे आता स्टॉक पिकर्ससाठी बाजारपेठ उघडण्याची शक्यता आहे. बाजारातील सुधारणांसाठी जागतिक घटकांचा प्रभाव महत्त्वाचा असेल. यामध्ये अमेरिकेची धोरणे आणि जागतिक विकास दर यांचा समावेश आहे. देसाई म्हणाले की, जागतिक मंदी किंवा मंदीच्या जवळ येण्याचा अंदाजावर परिणाम होऊ शकतो. यामुळे 2025 मध्ये भारतीय शेअर बाजार उच्च पातळीवर पोहोचण्यापासून रोखला जाईल.
तेव्हाच दुसरीकडे मॉर्गन स्टॅनली म्हणतात की, कोविडनंतर मूल्यांकन सर्वात आकर्षक आहे. कोविड महामारीपासून, हा बाजार टॉप-डाऊन किंवा मॅक्रो घटकांपेक्षा स्टॉक पिकर्सचा बाजार असण्याची शक्यता आहे. पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजीबद्दल बोलायचे झाले तर, देसाई हे चक्रीय, बचावात्मक, स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्ज-कॅप समभागांबद्दल उत्साही आहेत. मॉर्गन स्टॅनलीने आर्थिक, ग्राहक विवेकाधिकार, औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रांना ओव्हरवेट रेटिंग दिलंय.
भारताचा विचार करता, मॉर्गन स्टॅनलीचा ज्युबिलंट फूडवर्क्स, महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम), मारुती सुझुकी इंडिया, ट्रेंट, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), अल्ट्राटेक सिमेंट आणि इन्फोसिसवर जास्त भर आहे.
Share Market आरबीआय धोरणाचा बाजारावर परिणाम?
मॉर्गन स्टॅनलीच्या मते, भारतीय बाजारांनी आरबीआयच्या धोरणात्मक बदलाकडे दुर्लक्ष केलंय. भारत हा जगातील सर्वात पसंतीचा ग्राहक बाजार असेल. येथे जीडीपीच्या अंदाजात क्रेडिट वाढेल आणि उत्पादन क्षेत्राचा वाटा देखील वाढू शकतो.
देसाई यांनी सांगितलंय की, भारताचा कमी बीटा हा अनिश्चित मॅक्रो वातावरणासाठी एक आदर्श बाजारपेठ बनवतो. आमचा भावनिक निर्देशक मजबूत खरेदी क्षेत्रात आहे. मॉर्गन स्टॅनलीचा विश्वास आहे की, प्राप्तिकरात कपात केल्याने शहरी मागणी वाढेल आणि ग्रामीण वापराचा स्तरही सुधारेल. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून, सार्वजनिक आणि देशांतर्गत भांडवली गुंतवणूक वाढीला चालना देईल. खाजगी कंपन्यांचे भांडवली खर्च हळूहळू वसूल होईल.
मुख्य चलनवाढ कमी होईल. आर्थिक वर्ष 27 मध्ये महागाई दर 4.3 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. 2025 या आर्थिक वर्षात ते 4.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आपल्याला अमेरिकन सरकारच्या व्यापार आणि शुल्क धोरणांवर लक्ष ठेवावं लागेल. डॉलरची ताकद, फेडची प्रतिक्रिया, जागतिक वाढ आणि आर्थिक परिस्थिती यावर देखील लक्ष ठेवावं लागेल. राज्य पातळीवरील आर्थिक परिस्थिती आणि धोरणात्मक बदलांवरही लक्ष ठेवावे लागेल, असं देखील मॉर्गन स्टॅनलीने म्हटलंय.