5.2 C
New York

Vande Bharat Express  : वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करत आहात तर जाणून घ्या नवे नियम

Published:

वंदे भारत एक्सप्रेसने (Vande Bharat Express)  प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या गाडीतील सामानाच्या नियमांमध्ये भारतीय रेल्वेने (Indian Railways) बदल केले आहेत. 11 वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रात सध्या धावत आहेत.

सीएसएमटी (CSMT) ते जालना
सीएसएमटी ते मडगाव
सीएसएमटी ते सोलापूर
सीएसएमटी ते शिर्डी
मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते गांधीनगर
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद
नागपूर (Nagpur) ते बिलासपूर
नागपूर ते इंदूर
नागपूर ते सिकंदराबाद
पुणे (Pune) ते कोल्हापूर
पुणे ते हुबळी

Vande Bharat Express  वंदे भारत एक्स्प्रेसमधील सामानाचे नियम

वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या (Sitting Chairs) आहेत. सीटखाली सामान ठेवण्यासाठी जागा नाही. दोनपेक्षा जास्त ट्रॉली बॅग प्रत्येक प्रवाशाला (Trolley Bags) घेऊन जाण्याची परवानगी नाही. सामान ठेवण्यासाठी सीटच्या वर रॅक (Rack) आहेत. मोठे बॉक्स (Boxes) घेऊन जाण्यास परवानगी नाही. सीटच्या बाजूला प्रवाशांनी आपले सामान ठेवू नये, कारण त्यामुळे इतर प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण होईल.

Vande Bharat Express  सामान चोरी झाल्यास काय करावे?

वंदे भारत ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) आहेत. मात्र, सामान चोरीला गेल्यास, प्रवाशांनी तत्काळ अटेंडंट (Attendant), गार्ड (Guard) किंवा जीआरपी एस्कॉर्टकडे (GRP Escort) तक्रार करावी.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img