आज होळीच्या (Holi) दिवशी महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील किरकोळ महागाईचा निर्देशांक 4 टक्क्यांच्या खाली आल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. (Petrol Diesel Prices )
Petrol Diesel Prices मुंबईत (Mumbai) इंधन दरात मोठी घट
मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (Indian Oil Corporation – IOCL) आकडेवारीनुसार, मुंबईत पेट्रोल 44 पैशांनी स्वस्त होऊन 103.50 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 2.12 रुपयांनी स्वस्त होऊन 90.03 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबई वगळता दिल्ली (Delhi), चेन्नई (Chennai) आणि कोलकत्ता (Kolkata) या महानगरांमध्ये
Petrol Diesel Prices पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी 5 पैशांची वाढ होऊन दर अनुक्रमे 94.77 रुपये आणि 87.67 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
चेन्नई: पेट्रोल 100.80 रुपये आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल आणि डिझेलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. पेट्रोल 1.07 रुपयांनी वाढून 105.01 रुपये, तर डिझेल 1.06 रुपयांनी वाढून 91.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.
Petrol-Diesel Prices जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत किरकोळ घट झाली आहे. ब्रेंट क्रूड तेलाची (Brent Crude Oil) किंमत 0.14 टक्क्यांनी घसरून 70.85 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 14% घसरण झाली आहे. मुंबईकरांसाठी इंधन दर घसरल्याने दिलासा मिळाला असला, तरी इतर भागातील दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशावर ताण येणार आहे. केंद्र सरकारने नुकताच महागाईचा आलेख जाहीर केला होता, ज्यात महागाई कमी झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे नागरिकांना महागाईपासून थोडाफार दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.