भारतीय शेअर बाजार होळीनिमित्त म्हणजेच 14 मार्च रोजी बंद Stock Market राहणार की चालू राहणार याबाबत सध्या सोशल मीडियावर प्रश्न विचारला जात आहे. मात्र आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार भारतीय शेअर बाजार होळीनिमित्त 14 मार्च रोजी बंद रहाणार आहे. या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर कोणतेही व्यवहार होणार नाही. तर या आठवड्यात 13 मार्च गुरुवार व्यवहाराचा शेवटचा दिवस असणार आहे. 14 मार्च शुक्रवार, 15 मार्च शनिवार आणि 16 मार्च रविवार असल्याने भारतीय शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहणार आहे. तर 17 मार्च सोमवार रोजी भारतीय बाजारात व्यवहार होणार आहे.
तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले आहे. अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नवीन टॅरिफ नियम लागू करण्याची घोषणा केल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमकुवतपणा यामुळे भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) मोठी घसरण सुरु झाली आहे. सप्टेंबरनंतर निफ्टी 15 टक्क्यांनी खाली आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणांमुळे भारतीय शेअर बाजारासह अमेरिकन शेअर बाजारात देखील मोठी घसरण सुरु आहे. मंगळवारी एस अँड पी 500 चे बाजार मूल्य 4 ट्रिलियन डॉलर्सने (सुमारे 330 लाख कोटी रुपये) कमी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणांमुळे सुरुवातील अमेरिकन शेअर बाजार उत्साहित होता मात्र आता या बाजारात देखील मोठी घसरण होताना दिसत आहे. जर याच पद्धतीने अमेरिकन बाजारात विक्री आणि मंदी राहिली तर त्याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारात होऊ शकतो. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी आणि मजबूत अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तिथे होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा परिणाम भारतासह इतर बाजारपेठांवर होतो
Stock Market भारतीय शेअर बाजाराला सुट्टी कधी ?
भारतीय शेअर बाजारात होळीनंतर ईद-उल-फित्रच्या निमित्ताने सोमवार 31 मार्च, 10 एप्रिल रोजी श्री महावीर जयंती, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती, 18 एप्रिल गुड फ्रायडे , 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आणि 21-22 ऑक्टोबर रोजी दिवाळी (मुहूर्त ट्रेडिंग), 25 डिसेंबर ख्रिसमसला कोणतेही व्यवहार होणार नाही.