दिवंगत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार Ajit Pawar यांनी आज कराड प्रिती संगमावर जाऊन अभिवादन केलं. “सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली. यशवंतराव चव्हाणांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाणांची विचारधार कधीही सोडणार नाही” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. “जो पर्यंत मी राजकीय जीवनात आहे, तो पर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापी सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारेने महाराष्ट्राच भलं होणार, सगळ्या समाजाच भलं होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकांना न्याय देण्याच काम होणार आहे” असं अजित पवार म्हणाले.
महायुतीच्या सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर सुद्धा अजित पवार व्यक्त झाले. “मी म्हटलय दोन्ही बाजूच्या सन्मानीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे” असं अजित पवार म्हणाले. “इतिहास आपण वाचला आहे. इतिहासात अनेक मोठमोठ्या लोकांनी जी काही पुस्तक लिहिली आहेत, इतिहासाच संशोधन केलं आहे. इतिहासाची माहिती खोलवर मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील. त्यांनी अस वक्तव्य का केलं? त्यांच्या वक्तव्यामागचा हेतू माहित नाही, पंरतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारे जो मुस्लिम घटक आहेत, ते देशप्रेमीच आहेत” असं अजित पवार म्हणाले.
हे राज्य शिवरायांचे नाही मोदींचे झाले…, उद्धव ठाकरेंची टीका
Ajit Pawar ‘प्रश्न सोडवणं आमचं काम’
कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबद्दल अजित पवार म्हणाले की, “प्रश्न सोडवणं आमच काम आहे. प्रश्न सोडवले गेले नसतील, तर त्या संदर्भात मागणी करणं, निवेदन देणं, हे त्या संदर्भात काम करणाऱ्यांच काम आहे. अधिवेशन संपल्यावर वेळ पडल्यास सातार किंवा पुण्यात जाऊन विभागीय कार्यालयात बैठक घेईन” असं अजित पवार म्हणाले. “प्रश्न सोडवणं आमचं काम आहे. त्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यात कुठलाही हलगर्जीपणा केला जाणार नाही. कायदा-सुव्यवस्था अडचणीत येईल अशी विधानं करु नयेत” असं अजित पवार म्हणाले.